*पोलीस जाणीव सेवा संघाच्या शेंद्रा गावच्या महिला अध्यक्षपदी गीता पुजारी*

*पोलीस जाणीव सेवा संघाच्या शेंद्रा गावच्या महिला अध्यक्षपदी गीता पुजारी*

बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज

प्रतिनिधी-सम्मेद तरटे

शेंद्रा (औरंगाबाद)-         पोलीस जाणीव सेवा संघ शेंद्रा गावच्या महिला अध्यक्षपदी गीता रमेश पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली.

ही नियुक्ती पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवीसर फडणीस यांच्या हस्ते करण्यात आली. संघाचे ध्येय, धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचवून संघ वाढीसाठी प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.